Advertisement
सोलापूर : हैप्पी टू हेल्प फाउंडेशनच्या सहकार्याने झाडांची (भारतीय) मीचावकी जंगल निर्मीतीतून एक कोपरा चिमण्यांसाठी हा उपक्रम नेहरूनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात यशस्वीपणे राबविन्यात आला, या उपक्रमाची पाहणी आणि विद्यार्थ्यांचे कौतुक बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी केले. अशा उपक्रमशील शिक्षकांची गरज आज सर्व शाळांना असल्याचे ही ॲड. कोमलताई यांनी नमूद केले. सोलापूर मनपा आणि जिल्हा परिषद यांच्या प्रशासकीय वादात या जिल्हा परीषद शाळेकडे दुर्लक्ष होताना, सध्या भौतीकसुविधा ही मिळण्यास अडचणी येत असताना येथील शिक्षकांनी आपला शिक्षकी धर्मपूर्ण करीत अक्षरशः निधी मिळवण्यासाठी पायाची चाळण करीत कंपन्या, संस्था यांचा सीयसआर निधी मिळवत ११ लाखांची मदतीतुन अनेक सुविधा विद्यार्थ्याना पुरविल्या आहेत, याचे मोठे कौतुक वाटते, असे ही ॲड. कोमलताई यांनी सांगीतले. अतिशय गरीब परीस्थितीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याची नेण्याची तयारी ही स्वत: मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी उचलली आहे. अतिशय खडतर स्थितीमध्ये या शाळेत शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याबद्दल सर्वांबाबत कृतज्ञता ही ॲड. कोमलताई यांनी व्यक्त केली. यावेळी सोलापुर शहर अध्यक्ष कांचनताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या प्रियंकाताई पवार, अर्चना पवार, सोलापूर बहुजन रयत परिषदेचे सचिव बंडू पवार, चंदु चव्हाण, संपर्क प्रमुख दत्तात्रेय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
