#

Advertisement

Tuesday, January 16, 2024, January 16, 2024 WIB
Last Updated 2024-01-17T02:57:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर शिक्षण शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थिनींचा स्नेहमेळा उत्साहात

Advertisement


सोलापूर : सण समारंभ हे समाज संघटनेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्यादृष्टीने आखलेले कार्यक्रम संस्कृती संवर्धनाला हातभार लावतात. मकर संक्रांत ते रथसप्तमी या काळात हळदी कुंकू समारंभ केला जातो. सामजिक संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे हा उदात्त हेतू तर आहेच, याशिवाय यानिमित्ताने नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची नव्याने ओळख होत असते. यानिमित्त आज सोलापूर येथे मातोश्री गिरिजाबाई ढोबळे शिक्षण शास्त्र महिला महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेच्या विश्वस्त व बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे यांच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थिनींचा स्नेहमेळा आणि हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास श्री. अजय साळुंखे, संघटनेचे सरचिटणीस श्री. ईश्वर क्षीरसागर, राज्य संपर्कप्रमुख दत्तात्रय पाटील, संघटनेचे पदाधिकारी,  विद्यार्थिनी, शिक्षक उपस्थित होते.