#

Advertisement

Wednesday, January 17, 2024, January 17, 2024 WIB
Last Updated 2024-01-17T11:21:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपकडून ऑफर.., काँग्रेस सोडून जाणार नाही !

Advertisement

काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे स्पष्टीकरण  
अक्कलकोट :  भाजपकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट खुद्द काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, पुढेकाँग्रेस आमच्या रक्तात आहे आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असे स्पष्टीकरणही शिंदे यांनी दिले.
अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हूरडा पार्टी दरम्यान सुशिलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझा दोन वेळा पराभव झाला असला तरीही प्रणिती किंवा मला भाजप ऑफर देत आहे, असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. प्रणिती किंवा मला भाजपमध्ये या म्हणत आहेत पण आता ते कसे शक्य आहे. ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो, जिथे आमचं बालपण, तारुण्य गेलं. आता मी 83 वर्षाचा आहे त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणणार? त्यात प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही हे तुम्हाला माहिती आहे, असे  शिंदे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट केले आहे.