#

Advertisement

Thursday, January 25, 2024, January 25, 2024 WIB
Last Updated 2024-01-25T11:24:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तब्बल १२ तास रोहित पवार यांची चौकशी

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार रात्री १० वाजता ईडी कार्यालयाबाहेर पडले. सुप्रिया सुळे यावेळी त्यांच्या सोबत होत्या. रोहित पवार यांच्यासोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुनील भुसारा उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. आव्हानावर मात करून संघर्ष करून, पण सत्याच्या मार्गाने चालू. यंशवतराव चव्हाण यांचा वारसा आहे. तो पुढे नेण्याचे काम शरद पवार यांनी सहा दशके केले आहे. ही आमची लढाई आहे. आमच्या लढाईत दुर्दैवाने अनेक तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. संसदेचा डेटा सांगतो की, ईडी, प्राप्तिकर विभागाचे ९५ टक्के केसेस विरोधकांवर आहे. यासाठी स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे रोहितला नोटीस येणे ही फार आश्चर्यची गोष्ट नाही. रोहितने मोठी संघर्ष यात्रा काढली असून तो राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी, सोशित पीडित आणि वंचितांसाठी काही तरी करू पाहतोय. त्यामुळे कदाचित हे सूडाचे राजकारण असू शकते अशी भावना लोकांमध्ये आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.