#

Advertisement

Thursday, January 25, 2024, January 25, 2024 WIB
Last Updated 2024-01-25T17:05:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाविकास आघाडीचं लोकसभा जागा वाटप

Advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वाधिक जागा : शरद पवार गटाला कमी जागा 

मुंबई : महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यात आली. जागा वाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वाधिक जागा मिळणार असल्याची माहिती आहे. तर त्या पाठोपाठ काँग्रेसला जागा मिळणार. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला तिसऱ्या नंबरवर असणार आहे.
मुंबईतील सहा पैकी चार लोकसभा मतदारसंघात शिवसेना लढणार आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाणार आहेत.  तर महाविकास आघाडीतील वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना प्रत्येकी एक जागा सोडणार. या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोट्यातूनच दिली जाणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत काही मतदारसंघाबाबत रस्सीखेच सुरू आहे. मतदारसंघ जिंकण्यासाठी तुल्यबळ उमेदवार ज्यांच्याकडे असेल त्या पक्षाला तो मतदारसंघ दिला जाण्यावर एकमत करण्यात झाल. महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यातील काही लोकसभा मतदारसंघावरून चर्चा सुरु आहे. तर काही  मतदारसंघांची अदलाबदल होवू शकते.