Advertisement
कोरोना काळात सामाना ऑफिसमध्ये 16 आमदारांची बैठक संजय राऊत यांनी घेतली होती. या बैठकीत राऊत यांनी आपण मुख्यमंत्री होण्यास इच्छुक असल्याच सांगितलं होतं, असा खळबळजनक दावा राहुल कनाल यांनी केला. याबाबत सामना ऑफिसचं सीसीटीव्ही फूटेज आणि दोघांचा तीन वर्षांचा सीडीआर चेक करावा, असं आव्हानही राहुल कनाल यांनी दिले आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्याच नेत्यांना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला होता. अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनाल या शिंदे गटाच्या नेत्यांची नावं घेत राऊतांनी हा आरोप केला. या नेत्यांची नावं घेण्याची हिम्मत ईडी आणि किरोट सोमय्यांमध्ये आहे का] असा सवाल राऊतांनी केला आहे.