#

Advertisement

Friday, January 12, 2024, January 12, 2024 WIB
Last Updated 2024-01-12T12:07:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार?

Advertisement

मुंबई : महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सत्ता समिकरण  कसं असेल? यावर चर्चेला उधाण आलं होत असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीने 14 जागेवर दावा केल्याची माहिती समोर आली  आहे. तर, रायगड लोकसभा उद्धव ठाकरेंना सोडणार  आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही असताना मावळ जागेवरील हक्क सोडणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तर रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभेच्या 23 जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे. राज्यात 48 जागांची चाचपणी केल्यानंतरच आम्ही 23 जागांवर दावा केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात अडचण नाही. मात्र, एक दोन जागांसंदर्भातला तिढा वरिष्ठ नेते सोडवतील. त्यामुळे जागावाटपासंदर्भात कोणतीही अडचण येणार नसल्याचं राऊतांनी म्हटलं  आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी दोन महिन्यांत जिल्ह्यामध्ये बूथ कमिट्यांची स्थापना करण्याची सूचना शरद पवार यांनी दिल्या  आहेत.