Advertisement
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वच आमदारांना पात्र ठरवत शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं. इथं अतिशय महत्त्वाचा निकाल जाहीर झालेला असतानाच तिथं थेट उद्धव ठाकरे यांनाच शिंदे गटाकडून बोलावणं आल्याचं म्हटलं जात आहे.
सत्ता संघर्षाचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही लोकशाहीची हत्या आहे, राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, असं वक्तव्य करत टीका केली. ज्यानंतर या प्रकरणावर कळमनुरी विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एक वक्तव्य केलं. 'साहेब आता बस झालं ओ, तुमच्या आजुबाजूला असलेले चेले चपाटे तुम्हाला सुधरू देत नाहीयेत, यांना बाजूला करा...' असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. 'संजय राऊत यांनीच सगळा सत्यानाश करून टाकला, यांनी सगळी शिवसेना शरदचंद्र पवारांच्या खुट्याला नेऊन बांधली, यांनी काहीच ठेवलं नाही, म्हणून मला वाटतंय साहेब आजही वेळ गेली नाही, बाळासाहेब म्हणाले होते मला एका दिवसाचा पंतप्रधान करून दाखवा मी राम मंदिर बांधेन, आज तर येत्या 22 तारखेला साक्षात रामाचं आगमन होत आहे, त्यामुळे अजून वेळ गेलेली नाहीये, आपण हिंदुत्ववादी विचाराचे आहात असंच मला आजही वाटतंय, त्यामुळं आपण इकडं (शिंदे गटात) जर आलात तर लोक समजून घेतील, पुन्हा पहिले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विचार आपणही आपल्या हृदयात रुजून घ्यावेत हीच आपल्याला विंनती करतोय', असा सूर बांगर यांनी आळवला.