Advertisement
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर आज यश आले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने अध्यादेश काढला आहे. या विजयानंतर राज्यभरात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, याकरिता जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्याचा आनंद आणि समाधान असल्याची प्रतिक्रिया बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली.
सोलापूर येथे त्या माध्यमांशी बोलत होत्या. कायद्याच्या चौकटीत टिकणारे आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी सरकारची भूमिका होती. त्यादृष्टीने निर्णय सरकारने घेतला आहे. मराठा समाजाच्या प्रदीर्घ संघर्ष आणि लढ्याला आज अखेर यश आले.
मराठा समाज आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध पातळीवर लढा देत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यामातूनही समाजाने आरक्षणाची मागणी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनीही समाज हिताची भूमिका घेतली. याचा निश्चितच आनंद असल्याचे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.
