#

Advertisement

Saturday, January 27, 2024, January 27, 2024 WIB
Last Updated 2024-01-27T11:16:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात मराठी नाट्य संमेलनाचे उद्‌घाटन

Advertisement

सोलापूर :  सोलापुरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी जमली आहे. १०० व्या मराठी नाट्य संमेलनाचे आज सकाळी सोलापुरात मोठ्या थाटात उद्घघाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल तसेच स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे राज्य प्रवक्त लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्धाटन कऱण्यात आले.
सोलापुरातील नॉर्थकोट प्रशालेच्या प्रांगणात संमेलनाचा उद्घघाटन सोहळा रंगला. या वेळी मराठी नाट्य परिषदेचे प्रशांत दामले, संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश यलगुलवार, ज्येष्ठ कलावंत मोहन जोशी, प्रा. शिवाजी सावंत, अभिनेत्री रिंकू राजगुरू, आमदार सुभाष देशमुख, मोहन डांगरे, डॉ. बी. पी. रोंगे आदी मान्यवर पस्थित होते. या संमेलनाच्या निमित्ताने मागील तीन दिवसांपासून सोलापुरात विविध नाटकांची मेजवानी सुरू आहे. दि. २८ रविवारी  सायंकाळी संमेलनाचा समारोप होणार आहे.

जोशी आणि ढोबळे यांच्या दिलखुलास गप्पा
सोलापुरातील प्रमुख पाहुण्यांमध्ये ज्येष्ठ कलावंत मोहन जोशी नाट्य संमेलनाच्या उद्‌घाटनास उपस्थित होते. यावेळी शब्दप्रभू म्हणून ओळख असलेले माजी मंत्री तथा भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे आणि अभिनेते जोशी यांच्यामध्ये गप्पांची चांगलीच मैफल रंगल्याचे दिसून आले. ढोबळे यांची साहित्य क्षेत्राचा अभ्यास आणि नाट्य क्षेत्राशी असलेली जवळीक यातून दिसून आली.