#

Advertisement

Saturday, January 27, 2024, January 27, 2024 WIB
Last Updated 2024-01-27T10:47:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंगळवेढ्यात पाण्यावरून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Advertisement

मंगळवेढा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीला मतदान नाही असा ठराव प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत तालुक्यातील निंबोणी ग्रामपंचायतीत मांडण्यात आला आहे. दक्षिण भागातील शेतीच्या पाण्यावरून गेली अनेक वर्षे राजकीय व्यासपीठावरून सर्वच राजकीय पक्षांनी फसवणूक केल्यामुळे पाणी प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत या निवडणुकीत मतदान करणार नाही, असा ठराव करण्यात आला आहे.
सरपंच बिरूदेव घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये 124 ग्रामस्थ उपस्थित होते. दक्षिण भागातील जवळपास 35 गावांना शेतीच्या पाण्यावरून वंचित ठेवल्याच्या निशेधार्थ सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 35 गावाने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. त्यामध्ये 10 गावात कडकडीत बहिष्कार झाला तर 12 गावात अल्पसे मतदान झाले. त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. 35 मधील अकरा गावांना म्हैसाळ योजनेत समाविष्ट करण्यात आले, उर्वरित 24 गावासाठी मंगळवेढा उपशासन योजनेचा प्रस्ताव सादर केल्यानंतर या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली व भाजप शिवसेना सरकारच्या काळात या योजनेचे पुर्नसर्वेक्षण करण्यात आले.या काळातील तत्कालीन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी या योजनेत गंडवा गंडवी योजना, म्हणण्यात येत आहे. 2019 च्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा गावे आणि पूर्ववत ठेवत परत सर्वेक्षण करण्यात आले तर 2021 च्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक आमदार भाजपचा करा या योजनेला मंजुरी सह केंद्रातून पैसे उपलब्ध करतो असे आश्वासन दिले होते, मात्र यावर काहीच निर्णय झालेला नाही.