Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात 5 फेब्रुवारीला संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे 5 फेब्रुवारीला अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. यावेळी संपूर्ण मंत्रिमंडळही दर्शन करणार आहे.. आता अयोध्या दौऱ्याचा प्लॅन भाजपने तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्टा करण्यात आली. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार जाऊ शकले नाहीत. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स अकांऊटवरुन दिली.
