Advertisement
मुंबई : भाजपविरोधात लढणाऱ्या इंडिया आघाडी फूट पडल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगाल पाठोपाठ पंजाबमध्येही इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सर्वच्या सर्व जागा लढेल असं जहीर केले आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागा आहेत. या जागांवर आम आदमी पार्टी कुणाशीही युती करणार नाही असं भगवंत मान यांनी स्पष्ट केल आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी स्वतंत्र लढणार असली तरी दिल्लीत मात्र इंडिया आघाडीसोबतच लढणार असंही आपने जाहीर केल आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमधून स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपला पक्ष पुरेसा आहे, असं ममता बॅनर्जींनी म्हंटल आहे. राहुल गांधींच्या न्याय यात्रेबाबत आपल्याला माहितीही देण्यात आलेली नाही, असंही ममता बॅनर्जींनी म्हंटलंय. मात्र आपण इंडिया आघाडीचा भाग आहोत असंही ममता बॅनर्जींनी स्पष्ट केल आहे.ममता बॅनर्जींच्या या एकला चलो रेच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीतील फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आल आहे.
