#

Advertisement

Wednesday, January 24, 2024, January 24, 2024 WIB
Last Updated 2024-01-24T11:19:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंढरपुरातील महिला बचत गट मालामाल

Advertisement

PM सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ 

पंढरपूर : पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून बचत गटातील महिला आर्थिक सक्षम बनवू लागल्या आहेत. पंढरपूर शहरातील ईसबावी भागातील अनिता राजेंद्र पवार यांनी पुढाकार घेऊन दहा महिलांचा बचत गट तयार केला. या बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे घरगुती पदार्थ विक्रीसाठी तयार केले जात होते. नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेविषयी माहिती मिळाली. योजने अंतर्गत 18 वर्षावरील वैयक्तिक मालकी, भागीदारी, शेतकरी उत्पादक गट संस्था कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतशील शेतकरी यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाखपर्यंत सबसिडी अनुदानाचा लाभ दिला जातो. ही माहिती मिळाल्यानंतर आपल्या बचत गटातील महिलांना पवार यांनी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या बचत गटाचे असणारे सुरू असलेले चांगले काम यामुळे या योजनेच्या माध्यमातून चार लाख रुपयांच्या भांडवलासाठी त्यांचा बचत गट पात्र झाला.