#

Advertisement

Saturday, January 6, 2024, January 06, 2024 WIB
Last Updated 2024-01-06T12:29:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आदित्य L1 सूर्याच्या कक्षेत दाखल : ISRO च्या शिरपेचात मानाचा तुरा

Advertisement

जगात कोणालाही जमलं नाही ते भारताने करुन दाखवलं 
दिल्ली : चांद्रयान - 2 मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारताने आणखीन एक इतिहास रचला आहे. सूर्य मोहिमेवर ISROचे आदित्य एल-1 आपल्या निश्चितस्थानी म्हणजेच लॅग्रेंज पॉइंट-1 (L1) वर पोहोचले असून अंतिम कक्षेत स्थिरावेल. येथे आदित्य 2 वर्षे सूर्याचा अभ्यास करेल आणि महत्त्वाची माहिती गोळा करणार आहे. भारतातील ही पहिली सूर्य अभ्यास मोहीम इस्त्रोने 2 सप्टेंबर रोजी सुरू केली असून आज पुन्हा एकदा इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. 
L-1 पॉईंटच्या सभोवतालच्या प्रदेश हालो ऑर्बिट कक्ष म्हणून ओळखले जाते. जे सूर्य-पृथ्वीच्या सिस्टिममधील पाच स्थानांपैकी एक आहे. ही अशी जागा आहे जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांना संतुलित करतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये या पाच ठिकाणी स्थिरता आहे. त्यामुळे येथील असलेली वस्तू सूर्य किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात अडकत नाही.ते L-1 पॉईंटपासून पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एकूण अंतर फक्त 1 टक्के आहे. दोन ग्रहांमधील एकूण अंतर 14.96 कोटी किलोमीटर आहे. अंतिम कक्षेत पोहोचणे खूप आव्हानात्मक आहे आणि इस्रो प्रथमच असा प्रयत्न करत आहे. आदित्य-L1 वरून सूर्याची पहिली प्रतिमा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळण्याची शक्यता आहे.