#

Advertisement

Tuesday, January 9, 2024, January 09, 2024 WIB
Last Updated 2024-01-09T12:49:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नवी मुंबईत मनसैनिक-माथाडी कामगार भिडले

Advertisement


मुंबई : मनसेत अंतर्गत संघर्ष निर्माण झालाय. मनसेच्या पदाधिकाऱ्याने मनसेवरच गंभीर आरोप केले. महेश जाधव असं या पदाधिकाऱ्याचं नाव असून तो मनेसच्या मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष आहे. महेश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मनसेवर गंभीर आरोप केले. याचे पडसाद नवी मुंबईत उमटले. नवी मुंबईत खारघरमधील मेडीकव्हर रुग्णालयाबाहेर मोठा राडा झाला. कामगार नेते महेश जाधव समर्थक आणि मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. नवी मुंबईच्या रस्त्यावर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं बराच काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. महेस जाधव यांनी मनसे नेतृत्वानं मारहाण केल्याचा आरोप केलाय. त्यामुळं जाधव समर्थक विरुद्ध मनसे कार्यकर्ते असा वाद चिघळला आहे..
दरम्यान, कामगारांची बाजू घेतली म्हणून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला आहे. तर महेश जाधव खोटे आरोप करत असल्याचं मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी सांगितलं. मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून महेश जाधव हे अनेक बिल्डरांकडून खंडणी मागत होते, यासंदर्भातल्या तक्रारी राजगडवर येत होत्या. कामगारांची देणी देण्यासाठी महेश जाधव यांच्याकडून अडचण निर्माण केली जात होती.
दरम्यान,  पक्षाच्या कार्यालयात अनेक कामगार आले होते, त्यांनी महेश जाधव यांना समोरासमोर बोलवण्याची मागणी केली. महेश जाधव पक्ष कार्यालयात आल्यानंतर काही कामगारांनी त्यांना प्रश्न विचारले. याचं महेश जाधव यांनी उद्धट उत्तर दिली. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी त्यांच्यावर हात टाकला असं स्पष्टीकरण योगेश चिले यांनी दिलं आहे.