Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटापुढच्या अडचणी आता आणखी वाढत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शरद पवार गटाच्या आमदारांना हायकोर्टानं नोटीस जारी केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हायकोर्टात गेला आहे. ज्यामुळं आता शरद पवार गटाच्या 10 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं आमदारांना ही नोटीस बजावली. याप्रकरणी 14 मार्चपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली असून अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे.
