#

Advertisement

Wednesday, February 21, 2024, February 21, 2024 WIB
Last Updated 2024-02-21T12:00:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही : रोहित पवार

Advertisement

पिंपरी :  लोकसभेत बारामतीत नणंद-भावजय यांच्यात सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार का, असा प्रश्न शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना केला असता त्यांनी थेट स्पष्ट उत्तर दिले आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी काकी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.रोहित पवार म्हणाले की, बारामती लोकसभेत काकी विरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आत्तापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी लढत होणार, म्हणून अजित दादांविरोधात बोलू, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे या सलग तीन टर्म बारामतीच्या खासदार आहेत. या काळात त्यांनी विविध कामे केली आहेत. या जोरावर त्या संपूर्ण मतदारसंघात दौरा करत असतात. गावोगावी जाऊन त्यांचा संपर्क वाढवत आहेत. इंदापूर, खडकपूर, बारामती, दौंड, पुरंदर या भागातही त्या फिरत असतात. तर, एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती सेक्शन पार्क असेल किंवा इतर माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळं लवकरच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.