Advertisement
बारामती : मला सुद्धा सुप्रिया सुळेंचा प्रचार करायला आनंद होईल. शरद पवार माझ्यासाठी साहेब आहेत, मी त्यांचा खूप आदर करतो. त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. मी खूप छोटा आहे. ते माझ्याबद्दल बोलले खूप चांगलं वाटलं. लोकसभा निवडणुकीत जर साहेबांनी सांगितला, प्रचार करीन. साहेब म्हणतील तसं, असं सूचक विधान युगेंद्र पवार यांनी केल आहे.
आज युगेंद्र पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. पूर्वीपासून सामाजिक काम करत आलो आहे. इथे उपस्थित असलेले अनेक सहकारी पूर्वीपासून माझ्यासोबत काम करतायत. त्यांच्या विनंतीला मान देऊन इथे आलो आहे, असं युगेंद्र पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले होते की, कुटुंबात त्यांना एकट पाडलं जाईल. या प्रश्नावर युगेंद्र पवार म्हणाले की, मला असं वाटत नाही. कुटुंब फुटल आहे. अजितदादांना एकट पाडलं जातय असं मला वाटत नाही, कुटुंब एकच आहे. कुटुंब वेगळ ठेवलं पाहिजे. कुटुंबात मी छोटा माणूस आहे. मी आज फक्त कार्यालय बघायला आलो आहे, असं ते म्हणाले.
