#

Advertisement

Friday, February 2, 2024, February 02, 2024 WIB
Last Updated 2024-02-02T12:02:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुण्यात मनसेकडून ‘हे’ 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक

Advertisement

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे कोणासोबत जाणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाहीय. मनसेची भूमिका एकला चलो रे ची असू शकतो. पुण्यासाठी मागच्या काही महिन्यांपासून मनसेची चाचपणी सुरु आहे. आता पुण्यातून मनसेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोण इच्छुक आहे? त्यांची नाव समोर आली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नाव राज ठाकरे यांना कळवण्यात आली आहेत. लोकसभा प्रभारींनी राज ठाकरेंना नावांचा अहवाल दिला आहे. पुण्यातून 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यात वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे,गणेश सातपुते, यांच्या नावाचा समावेश आहे. राज्यातील सर्वच्या सर्व लोकसभेच्या 48 जागा लढवण्याइतकी मनसेची ताकद नाहीय. पण मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरी पट्ट्यात मनसेला जनाधार आहे. त्यामुळे शहरीबहुल मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करु शकते.