Advertisement
मुंबई : मविआच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी दिली. मात्र जागावाटपाबाबत पुढच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तर इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही असं सर्व मविआ नेत्यांसमोर आंबेडकरांनी सांगितल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर आंबेडकर गेल्यानंतर मविआ नेत्यांनी पुन्हा बैठक घेतली असून काय चर्चा सुरू आहे याबाबत उत्सुकता आहे.
