#

Advertisement

Friday, February 2, 2024, February 02, 2024 WIB
Last Updated 2024-02-02T12:09:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया

Advertisement

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्या डोळ्यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास होत होता. त्यानंतर डॉक्टरांकडून त्यांनी डोळ्याची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी लेझर ट्रिटमेंटद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी सकाळी ९ वाजता शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ठाणे येथील माजीवाडा येथील एका प्रख्यात डॉक्टरांकडून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे.

चष्म्याचा नंबर बदलल्याने समस्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चष्म्याचा नंबर बदलला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळचे अंधूक दिसू लागले होते. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करत शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.