Advertisement
सोलापूर : जिल्ह्याच्या मातीतून तृणधान्याच्या रूपाने सोनं पिकत आहे. या सोन्याला जागतिक बाजारपेठ मिळावी याकरिता आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष तथा मिलेट फेस्टिव्हल आणि हुरडा पार्टी या कार्यक्रमाच्या आयोजक, स्वागताध्यक्ष अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी दिले.
बालाजी सरोवरमध्ये सावली फाउंडेशन आणि ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी मिलेट फेस्टिव्हल आणि हुरडा पार्टी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे राज्य प्रवक्ते माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, उद्योजक राम रेड्डी, राज मणियार, कार्यक्रमचे संयोजक काशीनाथ भतगुणकी आदी उपस्थित होते.
अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे म्हणाल्या की, जिल्ह्यातील उत्पादनाच्या ब्रन्डींगसाठी हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. यापुढील काळातही महिला उद्योजिका, मिलेट उत्पादन यांच्यासासाठी सावली फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येती, असेही अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी सांगितले. यावेळी महिलांसाठी झालेल्या विविध स्पर्धोचे बक्षिस वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
