#

Advertisement

Thursday, February 1, 2024, February 01, 2024 WIB
Last Updated 2024-02-01T12:16:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाविकास आघाडी संभाजीराजेंना लोकसभेचे तिकीट देणार, पण ...

Advertisement

मुंबई : छत्रपती संभाजी राजे हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी यापूर्वीच केली होती. मात्र, अद्याप संभाजी राजेंना कोणत्याही पक्षानं पाठिंबा जाहीर केलेला नाही, अशातच आता महाविकास आघाडीने संभाजी राजे यांना लोकसभेचे तिकीट देऊ अशी ऑफर दिली आहे. मात्र, तिकीट पाहिजे असेल तर महाविकास आघाडीने राजेंसमोर एक अट ठेवली आहे.
महाविकास आघाडी  संभाजी राजेंना लोकसभा तिकीट देण्यास तयार आहे. लोकसभेचे तिकीट पाहिजे असेल तर संभाजी राजेंनी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करावा लागेल. ही अट मान्य केल्यास महविकास आघाडी त्यांना लोकसभेचे तिकीट देणार आहे. कोणत्याही एका पक्षात प्रवेश केल्यास कोल्हापूर मधून संभाजी राजेंना उमेदवारी देण्यावर महाविकास आघाडीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या या ऑफरबाबत राजे काय भूमिका घेणार? अट स्वीकारल्यास राजे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.