#

Advertisement

Saturday, February 10, 2024, February 10, 2024 WIB
Last Updated 2024-02-10T12:47:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आणखी एक राजकीय हत्या; भाजप नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू

Advertisement

जळगाव : महाराष्ट्र गोळीबाराच्या घटनांनी हादरला आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केला. मुंबईत मॉरिस नावाच्या व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या गोळीबारात जबर जखमी झालेल्या महेंद्र मोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते. दरम्यान ही हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत. चाळीसगाव गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.  महेंद्र मोरे यांच्यावर सुरुवातीला चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचराचांना साथ देत नसल्याने त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरु असताना महेंद्र मोरे यांची प्राणज्योत मालवली.