Advertisement
मंगळवेढा : संतनगरीत गेल्या ४० वर्षांपासून निर्माणाधीन असलेल्या नवमंदिरात श्री रिद्धी सिद्धी महागणपती मूर्ती, इतर देवी-देवतांसह ५१ साधू-संतांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण व ध्वजस्तंभारोहण सोहळा बुधवारी (दि.१४) होत असला तरी तत्पूर्वी विविध क्षेत्रातील मातब्बरांची मांदियाळी येथे दिसून येत आहे. मुंबईच्या श्री विठ्ठल रुक्मिणी वेद पाठशाळचे आचार्य वेदमूर्ती प्रसाद जोशी व आचार्य वेदमूर्ती हषिकेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत होत आहे.
या सोहळ्यानिमित्त आज सोमवार पासून धार्मिक विधीला सुरुवात झाली आहे. मंदिराचे अशोक कोळी व लता कोळी या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत. दरम्यान, सध्या, सोलापुरात राजकीय वातावरण तापू लागलेले असताना लोकसभेसाठी इच्छूक मंडळीची मांदियाळीही या धार्मिक कार्यक्रमास उपस्थिती दर्शवित आहे. हा सोहळा मंगळवेढा शहरात होत आहे. मंगळवेढा म्हणजे भाजपचे राज्य प्रवक्ते तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा बालेकिल्ला त्यामुळे या ठिकाणी येणारे पाहुणेही ढोबळे सरांची आवर्जून भेट घेत आहेत. त्यातच आजपासून येथे धार्मिक कार्यक्रम सुरू झाल्याने लक्ष्मणराव ढोबळे स्वत: कार्यक्रमस्थळी अनेक वेळ उपस्थित होते. मंगळवेढा म्हणजे आपल्या घरातील कार्यक्रम असल्याकाराने ढोबळे यांनी ओयाजकांशीही तेवढ्याच आपुलकीने संवाद साधत काही हवे, नको ते पाहिले. त्याच वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या तथा सोालापूरच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांचे आगमन या कार्यक्रमस्थळी झाले. तेथे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे ही उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी प्रणिती शिंदे यांना काँग्रेसने जाहीर केली आहे. तर, त्यांच्या तोडीस तोड आणि तेवढ्याच ताकदीच्या भाजपच्या दावेदार असलेल्या उमेदवार म्हणून लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे मानल्या जात असल्याने ढोबळे हे प्रणिती शिंदे यांच्या बरोबर काय संवाद साधणार, याकडे अनेकांनी कान टवकारले होते. परंतु, ढोबळे यांनी कोणताही राजकीय विषय न काढता प्रणिती शिंदे यांचे स्वागत करीत स्मितहास्य केले. तर, प्रणिती शिंदे यांनीही ढोबळे यांचे नम्रपणे स्वागत स्विकारले.
ढोबळे, शिंदे दिग्गज कुटुंब
सोलापूर जिल्ह्याच्या राजकाणात सुरवातीपासूनच लक्ष्मणराव ढोबळे आणि सुशीलकुमार शिंदे ही दोन्ही कुटुंब सर्वच अथाने दिग्गज मानली गेली आहेत. या कांग्रेस-राष्ट्रवादी असे आघाडीचे पक्ष असल्याकारणाने हे दोन्ही नेते अनेकदा एकाच राजकीय व्यासपिठावर आले आहेत. त्याचवेळी या दोन्ही नेत्यांच्या कन्या अर्थातच प्रणिती आणि ऍड. कोमलताई या दोघीही अनेकदा एकत्र दिसल्या आहेत. परंतु, तस या दोघींना मैत्रीणी म्हटले मरी हरकत नाही परंतु, राजकीय कालओघात आणि काैटुंबिक जबाबदारी तसेच राजकीय स्थित्यतंरे यामुळे गेल्या काही दिवसांत त्या कोठेही एकत्र दिसलेल्या नाहीत. परंतु, आता लोकसभेसाठी उमेदवार म्हणून या दोघींची नावे अग्रक्रमाने घेतली जात आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीत त्या दोघी आमने-सामने दिसल्या तर नवल नको.
