#

Advertisement

Friday, February 16, 2024, February 16, 2024 WIB
Last Updated 2024-02-16T08:52:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवार म्हणाले 'तू चंद्रावर जा आणि...'

Advertisement

बारामती : सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी ते मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्ते आणि आमदारांची भावना आहे. अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये नेत्यांकडून ही भावना बोलून दाखवली जाते आहे. अजित पवारांना या उत्साही नेते आणि कार्यकर्त्यांना जरा धीर धरा, असा सल्ला काही दिवसांपूर्वी दिला होता. पण त्यानंतरही कार्यकर्ते मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आज तर बारामतीत थेट अजित पवारांसमोर एका कार्यकर्त्याने तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी मागणी केली. त्यावर अजित पवारांनीही भन्नाट उत्तर दिलं. अजित पवार बारामतीत असून यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. भाषण सुरु असतानाच एक कार्यकर्ता 'दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा' असं ओरडला. त्यावर अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भन्नाट 'तू चंद्रावर जा आणि मला मुख्यमंत्री व्हायला सांग' असं उत्तर दिलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मी खोटं बोलत नाही. मी थोडा कडक शिस्तीचा आहे. पण काम चोख करुन घेतो.  . प्रत्येकाला बोलणं आवडेल असा माझा दावा नाही. माझ्यावरही काहीजण समाधानी नसतील. पण, आपण प्रत्यकेजण समाधानी होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं आवाहन यावेळी अजित पवारांनी केलं.