#

Advertisement

Saturday, February 24, 2024, February 24, 2024 WIB
Last Updated 2024-02-24T12:40:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मी शिर्डीसाठी इच्छुक; रामदास आठवलेंची अमित शहांकडे मागणी

Advertisement

दिल्ली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले हे शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आपण यासंदर्भात अमित शहा आणि जे.पी.नड्डा तसेच देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो आहे, असे ते म्हणाले. आम्हाला 1 जागा देण्यात यावी, अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली. लोकसभेत मी असावं, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आता महायुती मला जागा देईल. मोदींसाठी सगळ्यांनी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान मोदींच्या 400 पार धोरणावर यावेळी त्यांनी भाष्य केले. मागच्या 5 वर्षाप्रमाणे पुढच्या 5 वर्षात देखील विकासाची काम करता येतील. तसेच महाराष्ट्रात 45 जागा मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.