#

Advertisement

Monday, February 26, 2024, February 26, 2024 WIB
Last Updated 2024-02-26T11:49:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मी सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही !

Advertisement

सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला 

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा लढत पाहायला मिळणार आहे, अशातच अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना टोला लगावला आहे.
बारामतीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या विषयीची माहिती देणारा आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा विकास रथ शहरात फिरत आहे. अशातच पुण्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी मी मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही, अशा शब्दांत सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यावर बोचरी टीका आहे. मी आता जी मतं मागते ती मेरिटवर मागते. मतं मागायला मी जाते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही. लोकसभा निवडणूक लढायच्या दोन वर्ष आधीपासून मी मतदार संघांचे दौरे करत होते. दोन वर्षात मी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढलाय. मी लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं..असं कॉपी करून पास नाही होणार, मैं सुप्रिया सुळे हू..खुद करुंगी और खुद पास हुंगी," असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.

भातुकलीचा खेळ नाही
सुनेत्रा पवारांच्या निवडणुकीवरुन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. हा काही भातुकलीचा खेळ नाही. राजकारण भातुकलीचा खेळ नसतो. त्यात नाती नसतात पण जबाबदारी असते. नाती प्रेमाची असतात. मी नात्यांमध्ये आणि कामात गल्लत करत नाही. माझं काम एका जागेवर आहे. माजी नाती काही आडनावांपुरती मर्यादित नाही. मी सदानंद सुळेंसोबत जेवढा वेळ घालवते त्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांसोबत असते. नाती माझ्यासाठी कायमच राहतील.