#

Advertisement

Saturday, February 24, 2024, February 24, 2024 WIB
Last Updated 2024-02-24T12:16:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिंदेंसहीत अजित पवार गटाला कमळ चिन्हावर लढण्याची भाजपाची ऑफर?

Advertisement

मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाला भारतीय जनता पार्टीने कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती, असा धक्कादायक दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे जर खोटं असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावं, असं आव्हानही संजय राऊतांनी दिलं आहे.
शरद पवार गटाच्या चिन्हाचाच संदर्भ घेत राऊत यांनी भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमळ याच चिन्हावर लढण्याची ऑफर दिल्याचं राऊत यांनी म्हटलं. भाजपाने अजित पवार गट आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलेला की तुमचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील. (शिंदे गटाला) धनुष्यबाण मिळालं असलं तरीही लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. तसेच (अजित पवार गटाला) घड्याळ जरी दिलं असलं तरीही तुम्हाला लोक मतदान करणार नाही. त्यामुळे तुम्ही कमळावरच लढा, असं राऊत म्हणाले  आहेत.