#

Advertisement

Monday, February 19, 2024, February 19, 2024 WIB
Last Updated 2024-02-19T12:02:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा

Advertisement

पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय 
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाला  सुप्रिम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाचे नाव तसेच चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार, असा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. तर,  एक आठवड्याच्या आत चिन्हाचे वाटप करण्याचे निर्देशही सप्रिम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी आगामी निवडणुकीपर्यंत पक्षाचं नवं नाव कायम ठेवावं, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. ही विनंती कोर्टानं मान्य केली आहे. वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार आग्रही आहेत. येत्या आठवडाभरात शरद पवार गटाला नवं निवडणूक चिन्ह द्यावं, असे आदेशही सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी आगामी निवडणुकीपर्यंत पक्षाचं नाव कायम ठेवावं, अशी मागणी शरद पवार गटातर्फे करण्यात आली. ही विनंती कोर्टानं मान्य केली.