Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत खुलासा केला आहे. भाजपप्रवेशाबाबत केवळ अफवा आहेत. आमच्यातलं कुणीही भाजपात जाणार नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे.
मी पक्ष प्रवेश सोडणार बातमया कोठून येतात मला माहिती नाही. भाजपा कडून मला कोणतीही ऑफर आलेली नाही. आमचे लोक कुठेही जाणार नाहीत. मी दिल्लीला गेलो नाही. त्यामुळे बैठक दिल्लीत भाजपा नेते सोबत होण्याचे कारण नाही. मी 15 वर्ष कॅबिनेट राहिलो मला मंत्री पद हे प्रलोभन होऊ शकत नाही असा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. राजकारणात मोठा भूकंप होईल असे विधान अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी केले होते. यावर देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
