#

Advertisement

Tuesday, February 20, 2024, February 20, 2024 WIB
Last Updated 2024-02-20T13:12:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून शाहू महाराजांना उमेदवारी?

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेस येथे भेट घेतली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा होत असताना या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात होती. न्यू पॅलेसमध्ये शरद पवारांसोबत झालेल्या भेटीमध्ये शाहू महाराज छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. एक तासाहून अधिक काळ शरद पवार आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी काय झाले याची माहिती शरद पवारांनी दिली. कोल्हापुरच्या जागेसाठी छत्रपती शाहू महाराजांना संधी मिळणार का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले. उमेदवारीबाबत मविआसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मविआमध्ये 39 जागांवर एकमत झाले आहे.