#

Advertisement

Monday, February 19, 2024, February 19, 2024 WIB
Last Updated 2024-02-19T12:51:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुप्रिया सुळे म्हणाल्या आमचं अख्खं कुटुंब…

Advertisement

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे बारामतीत आहे. इथे माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीवर भाष्य केलं. कुणाला निवडणूक द्यायचं याचा निर्णय जनता घेईल. आमचं सगळं कुटुंब राजकारणात नाही. आमच्या कुटुंबाला तुम्ही राजकारणात कशाला आणता? अजितदादा बोलले असतील तर तुम्ही त्यांनाच विचारा…, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं.
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजय लढत अटळ असल्याचं दिसतं आहे. बारामती मतदारसंघात दोन्ही उमेदवार पवार घराण्यातलीच असणार आहे,  देशातील टॉप टेन लढती पैकी एक लढत बारामतीची असणार  आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भावजय सुनेत्रा पवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.
यावर सुळे म्हणाल्या की, निवडणूक हा काही भातुकलीचा खेळ नाही. माझं काम एका जागेवर आणि नाती दुसरीकडे… माझी नाती पवार, सुळे यांच्या पुरते मर्यादित नाही. अनेक नाती प्रेमाचे, विश्वासाचे असतात. नाती नेहमी राहतील पण माझी एक वैचारिक बैठक आहे.