Advertisement
सावली फाउंडेशन, ड्रीम फाउंडेशन व जल साक्षरता संमेलन मंचचे आयोजन
सोलापूर : सावली फाउंडेशन, ड्रीम 1. फाउंडेशन व जल साक्षरता संमेलन मंचच्या वतीने शुक्रवार (ता. २३) ते २३ मार्च २०२४ दरम्यान राष्ट्रीय जल साक्षरता अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी दिली.
या अभियान अंतर्गत शुक्रवारी (ता. २३) संत गाडगेबाबा जयंतीदिनी सात रस्ता येथे ड्रिम फाउंडेशनच्या कार्यालयापासून जलजागृती रथयात्रेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही यात्रा विविध शाळा व महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा व जलजागृती करणार आहे. या निमित्ताने जलजागृती पत्रक वाटप, घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि पाणी वापर, जल शुद्ध आणि जीवन संपन्नता यावर प्रबोधनपर व्याख्यान होणार आहेत. यामध्ये जलतज्ञ अनिल पाटील, सावली फाउंडेशनच्या अध्यक्ष अड. कोमलताइ ढोबळे-साळुंखे, लेखिका सुरेखा शहा, माजी प्राचार्य प्रा. निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी यांच्यासह मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
शाहीर रमेश खाडे यांचा प्रबोधनकार प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. जलतज्ञ शैलेंद्र पटेल, विनोद बोधनकर, सागर म्हेत्रे, प्रवीण तळे, श्रीकृष्ण माढेकर, प्रा. धनंजय शहा, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष तानाजी माने यांचेही विविध ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे.
दरम्यान, विविध गावात पाणी परिषद, ग्रामीण महाविद्यालयात जल जागृती परिसंवाद, चर्चासत्र आणि गाळ काढण्यासह विविध उपक्रम आहेत. या अभियानात शाळा महाविद्यालयांनी, नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच पाणी व जीवनगाणी हा जलजागृती सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी सतीश पाटील ७२१९० ९९ ९५५ आणि ९८९०९४८३८८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस मंजुनाथ तुळे उपस्थित होते.
