#

Advertisement

Friday, February 23, 2024, February 23, 2024 WIB
Last Updated 2024-02-23T11:23:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार : नवीन चिन्ह, नवीन सुरुवात

Advertisement

रायगडावर तुतारी चिन्हाचा भव्य लाँचिंग सोहळा 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूसहे चिन्ह दिल आहे. शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी घेऊन रिंगणात उतरणार आहे. याच तुतारी चिन्हाचा किल्ले रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे. शरद पवार नावाचा संघर्षशील योद्धा पुन्हा नवीन पक्ष, नवीन नाव आणि नवीन चिन्हासह राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहे. हाती तुतारी घेत शरद पवार पुन्हा रान पेटवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आव्हान सोपं नाही...
शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळ हेच चित्र लोकांच्या मनावर बिंबलं गेल आहे. त्यामुळे तुतारी हे नवीन चिन्ह लोकांच्या मनात बिंबवण्याचं काम तेवढं सोपं नाही. शरद पवारांनी ज्यावेळी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष काढला. त्यावेळी निवडणुका झाल्या, त्यावेळी लोकांना विचारले त्यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही मतदान शरद पवारांनाच केले. चिन्ह विचारल्यानंतर ते म्हणाले की, हाताच्या चिन्हाला मतदान केले. त्यामुळे राजकीय पक्षांचे चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवणे सोपं नाही.