#

Advertisement

Friday, February 23, 2024, February 23, 2024 WIB
Last Updated 2024-02-23T11:53:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दादा भुसे, उदय सामंतांना हेलिकॉप्टरमधून उतरवलं...

Advertisement

नंदूरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंचं वेगळं रुप पाहायला मिळालं. येथील धडगावमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या आदिवासी मेळाव्यासाठी श्रीकांत शिंदे हेलिकॉप्टरने आले होते. कार्यक्रमानंतर पुढील नियोजित कार्यक्रमासाठी श्रीकांत शिंदे धुळ्याला निघाले. मात्र श्रीकांत शिंदे हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर मेळाव्याला हजेरी लावलेल्या काही विद्यार्थ्यांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली. या गर्दीतील विद्यार्थ्यांना घेऊन श्रीकांत शिंदेंनी चक्क एक फेरफटका मारुन आणला. यासाठी त्यांनी आपल्याबरोबर असलेल्या शिंदे गटातील दोन मंत्र्यांना काही काळ हेलिकॉप्टरमधून खाली उतरण्याची विनंती केली. या मंत्र्यांनीही ही विनंती मान्य करत आदिवासी विद्यार्थ्यांना या अनोख्या हवाई सफरीचं गिफ्ट देण्यात हातभार लावला.