#

Advertisement

Friday, February 23, 2024, February 23, 2024 WIB
Last Updated 2024-02-23T11:42:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिवसेनेचा अनुभवी नेता हरपला ; लक्ष्मणराव ढोबळे

Advertisement

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते, वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मनोहर जोशी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. मनोहर जोशींच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सोलापूरचे नेते, भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून ते त्यांच्या सोबत होते. शिवसेनेचे ते ज्येष्ठ, अनुभवी, आक्रमक,  नेते होते, अशा शब्दात ढोबळे सरांनी श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुळचे बीड जिल्ह्यातील होते. 2  डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले होते. मनोहर जोशी हे उच्च शिक्षित होते.  त्यांनी M.A. L.L.B  असे पदवी शिक्षण पूर्ण केले.  M.A. झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. पण, नोकरीपेक्षा त्यांचा कल व्यवसाय करण्याकडे जास्त होता. त्यांनी कोहीनूर इंस्टीट्यूटही सुरू केली. जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवयायिक प्रशिक्षण देणे सोपे होईल.