#

Advertisement

Friday, February 23, 2024, February 23, 2024 WIB
Last Updated 2024-02-23T11:58:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जगाला ताकद दाखवून द्यावी लागेल; पंकजा मुंडे यांच्या मानात काय ?

Advertisement

बीड : लोकसभेचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी घेतील असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले आहे. बीडची लोकसभेची जागा प्रीतम मुंडेच लढतील अशी भूमिका पंकजा मुंडेंनी याआधी घेतली होती. मात्र,  आता पंकजांनी वरिष्ठांवर हा निर्णय सोपवला आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आष्टीमध्ये बूथप्रमुखांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे या बीडची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू असून यावरच पंकजा मुंडे यांना विचारला असता बीडची लोकसभा नेमकं कोण लढवणार हे पक्षातले श्रेष्ठ लोक ठरवतील असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. आष्टी मध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेण्यात आली आणि या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बूथ रचना केली जात आहे आणि या कामाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाले आहेत 2014 आणि 19 मध्ये याच कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूने चांगलं काम केलं होतं त्यामुळे उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात निश्चित होईल अस पंकजा मुंडे म्हणाल्या.