Advertisement
मुंबई : आजपासून (26 फेब्रुवारी) विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आज विधानपरिषदेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु झाले तर विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता सुरू झालं. 5 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. सभागृहाच्या कामकाजामध्ये पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचे राज्य प्रवक्ते तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सोलापूर मतदार संघ आणि अर्थसंकल्प याबाबत काही माहिती जाणून घेतली. ढोबळे यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी ही संवाद साधला.

