#

Advertisement

Tuesday, February 27, 2024, February 27, 2024 WIB
Last Updated 2024-02-27T12:48:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लिफ्ट काय.., आमचा पक्षच खाली केला

Advertisement

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज विधान भवनात गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने राज्यभरातील लोकप्रतिनिधी आज विधान भवनात दाखल झाले. त्यामुळे विविध पक्षांचे आमदार एकमेकांना भेटत होते. हसत-हसत एकमेकांना मिश्किल टोमणे लगावत होते. असाच काहीसा प्रकार आज विधान भवनात बघायला मिळाला. विधान परिषदेच्या सभागृहातून बाहेर येताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज अचानक लिफ्टच्या शेजारी भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर यांची भेट झाली. यावेळी ठाकरेंसाठी संपूर्ण लिफ्ट खाली करु, असं प्रसाद लाड म्हणाले. त्यावर ठाकरेंनी आमचा सर्व पक्षच खाली केला, असा खोचक टोला लगावला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.