#

Advertisement

Friday, February 23, 2024, February 23, 2024 WIB
Last Updated 2024-02-23T12:23:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय : रणधुमाळीला सुरुवात

Advertisement

बारामती : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्राच सर्वाधिक लक्ष असेल ते बारामतीच्या निकालावर.  लोकसभेला बारामतीमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक 2024 मध्ये परस्पराच्या विरोधात असतील, हे जवळपास स्पष्ट होऊ लागल आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सुप्रिया सुळे आज बारामती मतदारसंघातील गावां भेटी देणार आहेत, तर सुनेत्रा पवार बारामतीमधील विविध विकासकामांच भूमिपूजन करणार आहेत. जय पवारांनी गावभेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.
बारामती हा शरद पवार आणि अजित पवार दोघांचा बालेकिल्ला. विधानसभेला अजित पवार आणि लोकसभेला सुप्रिया सुळे हे बारामतीच ठरलेलं समीकरण आहे. पण यावेळी हे समीकरण बदलणार आहे. कारण यापुढच्या राजकारणात अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे परस्परांचे राजकीय़ प्रतिस्पर्धी असतील. बारामतीच्या राजकीय पीचवर नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे.