Advertisement
नगर : बहुजन रयत परिषदेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा रविवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता टिळक रोड हॉटेल राज पॅलेस येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्याचा शुभारंभ माननीय खासदार डॉ. सुजय विखे. व माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून नगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप व जिल्ह्याचे युवा नेते नितीन दिनकर उपस्थित राहणार आहेत. तर, मेळाव्याच्या अध्यक्षा म्हणून बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अड. कोमल साळुंखे-ढोबळे या राहणार आहेत. कार्यक्रम पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती करण्यात येणार असून महत्तवपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष प्रा. ना.म. साठे, बापूसाहेब गायकवाड, संतोष साळवे, रविंद्र कनगरे यांनी केले आहे.
