#

Advertisement

Wednesday, February 7, 2024, February 07, 2024 WIB
Last Updated 2024-02-07T12:01:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार गटाने आयोगाकडे पाठवलेल्या नव्या नावात "नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी"

Advertisement

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. तर शरद पवार यांच्या गटाला आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला तीन नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या या आदेशानुसार शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यातील पहिलं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी–शरद पवार, दुसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी– एस असं निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे.


चिन्हाचा प्रस्ताव पाठवला गेला नाही
शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी त्यांच्याकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. यामागेदेखील एक कारण आहे. राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर होत नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा फोटो पाठवण्यात आलेला नाही.