Advertisement
बीड : परळीतून महायुतीचा उमेदवार कोण असणार? याची सर्वत्र चर्चा आहे. अशात आता पंकजा मुंडे यांच्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघाऐवजी वेगळा पर्याय भाजपने समोर दिल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जर पंकजा यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर धनंजय मुंडे त्यांचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील, अशीही माहिती आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांच्या जागी बीड लोकसभेतून पंकजा यांना उमेदवारी मिळण्याचा अंदाज आहे. जर पंकजा यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर त्यांचे बंधू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे त्यांचे स्टार प्रचारक असतील अशी माहिती आहे. बीडमधून लोकसभेला कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
