Advertisement
लिलावाच्याही चर्चा; बड्या नेत्याकडून खुलासा
रावेर : अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी एकनाथ खडसे यांना 137 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांनी हा दंड वेळेत भरला नाही, तर एकनाथ खडसेंची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
याबाब गिरीश महाजन म्हणाल की , एकनाथ खडसेंनी त्यांच्या कुटुंबाकडून जमीन घेतली. त्यातून मुरुम उत्खनन केले. मात्र खडसेंनी जमिनीची रॉयल्टी भरली नाही. हा कोट्यावधी रूपाचा मुरुम विकला, खडसेंनी हा सर्व पैसा काळ्या मार्गाने घेतला आणि त्यावर त्यांनी रॉयल्टी दिल्याचा एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे खडसेंना 137 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने खडसेंना फटकारले आहे. तसेच खडसेंना तातडीने 35 कोटींचा दंड भरावा लागणार आहे. खडसेंनी वेळेत दंड भरला नाही तर लीलावत यांच्याकडून त्यांची संपूर्ण मालमत्ता जप्त केली जाण्याची शक्यता गिरीश महाजनानी यांनी व्यक्त केली.
