#

Advertisement

Friday, February 16, 2024, February 16, 2024 WIB
Last Updated 2024-02-16T09:05:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बारामतीत नणंद विरुद्ध भावजय?

Advertisement

सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देण्याची शक्यता 

बारामती : बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी अजित पवारांकडून मोठी खेळी खेळण्यात येणार आहे. बारामतीत लोकसभेमध्ये नणंद-भावजयीत लढत होण्याची चिन्हे आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, आता सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या कामाचा आढावा घेणारा व प्रचार करणारा विकासाचा रथ मतदारसंघात फिरताना दिसत आहे. गुरुवारी संध्याकाळी पूजा झाल्यानंतर हा बारामती आणि इतर गावांमध्ये रथ फिरताना दिसत आहे.  त्यामुळं नणंद-भावजयमध्ये हा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.
बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवारही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देणार असल्याची शक्यता आहे. सुळे यांच्या विकासरथाला सुनेत्रा पवार यांनी विकास रथातून उत्तर देणार आहेत, अशा चर्चा रंगत आहेत. सुप्रिया सुळे यांचा विकास रथ आधीपासून मतदारसंघात फिरत आहे. त्याचबरोबर आता गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचाही विकास रथ बारामती मतदारसंघात फिरताना दिसत आहे. तसंच, सुनेत्रा पवार यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांची भेट घेतली होती.