#

Advertisement

Wednesday, March 6, 2024, March 06, 2024 WIB
Last Updated 2024-03-06T11:19:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम

Advertisement

संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर 

दिल्ली : महायुतीच्या जागावाटपावर अद्याप शिक्कामोतर्ब झालेले नाही. भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम आहे. मात्र भाजपा या 32 जागा लढवत असताना काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याच पाहायला मिळत आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा केंद्रीय मंत्री अमित शहा सोडवणार आहेत. भाजपने महाराष्ट्रीललोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
1. पुणे : मुरलीधर मोहोळ. 
2. धुळे : सुभाष भांबरे यांच्या ऐवजी प्रदिप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.
3. नांदेड - प्रतापराव चिखलीकर यांच्या जागी मिनल खतगावकर
(अशोक चव्हाण यांची भाची.आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली ) उमेदवारी पुन्हा देण्याची शक्यता.
4. जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.
5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवल जाण्याची शक्यता.
6. नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.
7. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.
8.  अकोला : संजय धोत्रे
9. ईशान्य मुंबई : मनोज कोटक
10. सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्या ऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.