Advertisement
युगेंद्र पवारांचा थेट निशाणा नेमका कुणावर
बारामतीत : शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय झाले आहेत. युगेंद्र पवारांनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. बारामतीमध्ये सध्या पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. बारामतीत कोणी धमकावत असेल तर माझी भेट घालून द्या, पुढच मी बघतो असं म्हणत युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
बारामतीत दहशतीचा आणि वेगळ्या प्रकारचे राजकारण असेल तर माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी थेट अजित पवारांना आव्हान दिले आहे. युगेंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी गावभेट दौरे करत आहेत. सुप्रिया सुळे गटासोबत जोडल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याची चर्चा सध्या बारामती सुरू आहे. या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार यांनी प्रस्थापितांना थेट इशारा देत बारामतीत वेगळ्या प्रकारचं राजकारण होत आहे. बारामतीकरांनी असे दहशतीचं राजकारण कधी बघितलं नाही.
