Advertisement
कोल्हापूर : संभाजी राजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष राज्यात कोणतीही निवडणूक लढणार नाही असं संभाजी राजे यांनी जाहीर केलं आहे. कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना जाहीर झाली आहे. त्यांच्या प्रचारात 100 टक्के उतरणार असल्याचं संभाजी राजे यांनी म्हटल आहे. माझ्यासाठी माझे वडिलच सर्वस्व आहेत, वडिलांसाठी आपण निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचं संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल आहे.
लोकसभा निवडणुकीत उभा राहायचं निश्चित होतं, मात्र ज्यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि आमचे वडील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमचा प्रश्नच येत नाही, असं संभाजी राजेंनी म्हटल आहे. शाहू महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या निवडणुकीत 100 टक्के काम केलं असतं तर महाराज यांच्या प्रचारात 110 टक्के काम करणार, जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार आहे, निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचं काम थांबणार नाही कष्ट करण्यात आम्ही कुठंही कमी पडणार नाही असं संभाजी राजे यांनी स्पष्ट केलं आहे.
